शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (14:58 IST)

जपान : धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना ६ दिवस अतिरिक्त सुट्टी

जपानच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी हटके नियम लागू केलाय. या नियमानुसार जे कर्मचारी धूम्रपान करत नाहीत त्यांना धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी दिली जाणार आहे.  हा नियम टोकियोस्थित ऑनलाईन कॉमर्स कन्स्लटिंग अँड माकेर्टिंग कंपनी  करण्यात आलाय. 

धूम्रपान कऱणाऱे कर्मचारी इतरांच्या तुलनेत अनेकदा जागेवरुन उठतात. यामुळे कंपनीचे नुकसान होतेच. मात्र त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना आपण धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक काम करतोय असे वाटते. 

कंपनीचे प्रवक्ता हिरोताका मत्सुशिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे ऑफिस २९व्या मजल्यावर आहे आणि धूम्रपानासाठी कर्मचाऱ्यांना तळ मजल्याला यावे लागते. यात १० मिनिटे वाया जातात. तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती एकत्र भेटल्या की त्यांच्या गप्पा रंगतात आणि त्यात वेळ जातो. 

त्यामुळेच कंपनीने धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. १ सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात आलाय. यामुळे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी झालीये.