बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

आयएसच्या वळणावर तालिबान, जारी केला आत्मघाती हल्ल्याचा व्हिडिओ

इस्लामिक स्टेट
इस्लामिक स्टेट सारखेच तालिबानही व्हिडिओच्या मदतीने आपली ताकद दाखवू इच्छित आहे. तालिबान ने अफगाणिस्तानाच्या नवा जिल्ह्यातील पोलिस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याची ड्रोनने रेकॉर्डिंग करून व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ आयएस च्या व्हिडिओप्रमाणे तयार करण्यात आला आहे.
या व्हिडिओत जिहादी विस्फोटकाने भरलेल्या गाडीत बसून हल्ला करण्यासाठी निघतो. तो ही कार रस्त्यावरून अगदी सहजपणे पोलिस मुख्यालयापर्यंत नेतो आणि परिसराच्या अगदी मधोमध नेऊन स्फोट करतो. हा हल्ला 3 ऑक्टोबर रोजी झाला होतो. यात नवा शहराचे पोलिस प्रमुखासह अनेक पोलिस कर्मचारी ठार झाले होते. हा पूर्ण व्हिडिओ ड्रोनने रेकॉर्ड केला गेला आहे.


या हल्ल्याच्या मागे विचित्र बाब ही आहे की याचा मुख्य उद्देश्य अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नावाची दहशत पसरवणे. या उद्देश्यानेच अमेरिकी ड्रोन कॅमर्‍याने फिदायीनचा पूर्ण व्हिडिओ तयार केला गेला.