दोन माजी अध्यक्षांना निनावी पार्सलमध्ये स्फोटक पदार्थ
अमेरिकेच्या दोन माजी अध्यक्षांच्या घरांमध्ये आलेल्या निनावी पार्सलमध्ये स्फोटक पदार्थ सापडली आहेत. डेमोक्रेटिक पक्षाचे दोन माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांना ही पार्सल मिळाली होती. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस या तपास यंत्रणेनं केलेल्या तपासामध्ये ही स्फोटकं असल्याचं निष्पन्न झालंय.
क्लिंटन यांच्या मॅनहॅटन इथल्या घरी तर ओबामांच्या वॉशिंग्टनमधल्या पत्त्यावर ही पार्सल आली होती. आलेल्या टपालांच्या नियमित छाननीमध्ये ही पार्सल संशयास्पद वाटल्यानं ती सिक्रेट सर्व्हिसकडे धाडण्यात आली होती. यात स्फोटकं असली तरी अशी पार्सल माजी अध्यक्षांपर्यंत पोहोचणार नाहीत आणि त्यांना कोणताही धोका नसल्याचं तपास यंत्रणेनं स्पष्ट केलंय.