शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2017 (11:36 IST)

पृथ्वीचे बदललेले रूप 'नासा'च्या कँमेर्‍यात कैद

अवकाशातून आपली पृथ्वी रात्रीच्या दिव्यांनी कशी उजळून निघत असेल याची आपण कल्पना केली असेल. पण नासाने हे कल्पनेतले चित्र वास्तवात टिपले आहे. 'अर्थ अॅट नाईट' या शीर्षकाखाली अंधार्‍या रात्रीतला पृथ्वीचा नकाशा नासाने समोर आणला आहे. झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे पृथ्वीचा चेहराच बदलला आहे. जंगल नाहीशी होऊनही इमारती उभ्या राहात आहेत. हेच बदललेले पृथ्वीचे रूप नासाचे वैज्ञानिक म्यूगल रोमन यांनी कॅमेर्‍यात कैद केले आहे. 2012 साली पृथ्वीचे अंधार्‍या रात्री दिव्यांनी उजळून निघणारे दृश्य नासाने टिपले होते. हे छायाचित्र तेव्हा खूप व्हायरल झाले होते. आता दररोज हा नकाशा अपडेट करण्याचा नासाचा प्रयत्न आहे.