सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By BBC|
Last Modified सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (16:24 IST)

भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया हादरलं, मृतांचा आकडा 40 वर

earthquake
इंडोनेशियाचं जावा बेट भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे. अनेक इमारती कोसळल्याची माहिती मिळते आहे.
 
या भूकंपात 40 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.
 
मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनानं व्यक्त केलीय. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, 5.6 रिश्टर स्केलचे हे भूकंपाचे धक्का होते. पश्चिम जावा प्रांतातील सियांजुर प्रदेशात हे धक्के बसले.
 
या भूकंपाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात या भूकंपाची भयानकता दिसतेय.
 
सियांजुर हॉस्पिटलमध्ये जवळपास 300 जणांवर उपचार सुरू आहेत, असं हर्मन सुहेरमन या शासकीय अधिकाऱ्याने मेट्रो टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
 
ज्या इमारती कोसळल्या आहेत, तिथून रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करणारी पथकं प्रयत्न करत आहेत. "मी काम करत होते, तेव्हा इमारत हलल्यासारखी वाटली. भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवत होते. हे नक्की काय होतं, हेच कळत नव्हतं. हे धक्के काही वेळ तसेच सुरू होते," असं वकील असलेल्या मायादिता वलुयो यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं.