1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (13:14 IST)

Earthquake : चिलीची राजधानी सॅंटियागोमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रता

चिलीची राजधानी सॅंटियागो येथे गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचे केंद्र सॅंटियागोच्या नैऋत्येला 328 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
 
काही दिवसांपूर्वी चिलीतील इक्विक येथे 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने नोंदवले की इक्विकमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू चिलीपासून 519 किमी आग्नेय दिशेला होता. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
 
Edited By - Priya Dixit