शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (14:36 IST)

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचं देशवासीयांना भावूक पत्र

माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. असे सांगत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशवासीयांना भावूक पत्र लिहिले आहे.
 
तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केल्यनांतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. असे वृत्त सर्वत्र पसरले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देशवासीयांना भावूक पत्र लिहित देश का सोडला? याचे कारण दिले आहे.
 
अशरफ गनी यांनी पोस्ट काय लिहिले... 
राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जर अफगाणिस्तानात राहिलो असतो तर मोठ्या संख्येने लोकं देशासाठी लढायला आले असते. अशा परिस्थितीत असंख्य लोकांचा मृत्यू झाला असता. तसेच काबुल शहर पूर्णपणे उद्धवस्त झाले असते. म्हणून मला देश सोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. आता तालिबान जिंकला आहे. त्यामुळे आता अफगाण लोकांचा सन्मान, संपत्ती आणि सुरक्षेसाठी तो जबाबदार आहे. एका ऐतिहासिक परीक्षेचा तालिबान सामना करत आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल किंवा इतर ठिकाणांना आणि नेटवर्कला प्राधान्य देईल.'
 
पण अशरफ गनी यांनी आपल्या पोस्टमधून सध्या ते कुठे आहेत, याबाबत माहिती दिली नाही आहे. टोलो न्यूजच्या माहितीनुसार, अफरश गनी ताजिकिस्तानमध्ये आहे. दरम्यान शांती प्रक्रियाचे प्रमुख अब्दुल्ला-अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानवर ही परिस्थिती आणण्यासाठी गनी यांना दोषी ठरवले आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. याशिवाय काबुल विमानतळावरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.