1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (09:31 IST)

पाकिस्तानात पुराचा हाहाकार सुरूच, मृतांचा आकडा १००० च्या पुढे

floods
पाकिस्तानात विनाशकारी पुराचा तांडव सुरूच आहे.या आपत्तीतील मृतांची संख्या 1000 च्या वर गेली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 1527 लोक जखमी झाले आहेत.त्याच वेळी 719,558 जनावरांचाही मृत्यू झाला आहे.गेल्या 24 तासांत 119 जणांचा मृत्यू झाला असून 71 जण जखमी झाले आहेत. 
 
गेल्या 24 तासांत सिंध प्रांतात 76, खैबर-पख्तूनख्वामध्ये 31, गिंगिट-बाल्टिस्तानमध्ये सहा, बलुचिस्तानमध्ये चार आणि पीओकेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.एनडीएमएच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण पाकिस्तानमधील  3,451.5 किमी रस्ते खराब झाले आहेत आणि 149 पूल कोसळले आहेत, तर 170 दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत.त्याच वेळी, 10 लाखांहून अधिक घरांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आहे. 
 
पाकिस्तानातील किमान 110 जिल्हे पुराच्या तडाख्यात आहेत, त्यापैकी 72 जिल्हे आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.बचाव पथकांनी पुरात अडकलेल्या 51,275 लोकांना वाचवले असून 4,98,442 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.