सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (13:53 IST)

हृदय द्रावक ! मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागात, वडिलांनी कुटुंबातील 7 जणांना जिवंत जाळले

आजच्या काळात काय होईल काहीच सांगता येत नाही. एका मुलीने आपल्या वडिलांच्या मनाविरुद्ध प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून वडिलांनी कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळून टाकण्याची घटना समोर आली आहे. ही घटना आहे पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुजफ्फरगड येथील . इथे एका वडिलाने आपल्या दोन मुली आणि त्यांच्या  कुटुंबातील 7 जणांना जिवंत जाळले आहे. मंजूर हुसेन असे या आरोपीचे नाव असून त्याच्या मुलीने प्रेम विवाह केला म्हणून रागाच्या भरात येऊन आपल्या  घराला आग लावली.या घरात त्याची मुलगी फौजिया बीबी आणि खुर्शीद माई आपल्या कुटुंबियांसह राहायचा.सुदैवाने फौजिया बीबीचे पती मेहमूद अहमद घरी नसल्याने ते बचावले. या आगीत मंजूर हसन ची मुलगी फौजिया बीबी आणि खुर्शीद माई आणि खुर्शीद यांचे पती आणि फौजिया आणि खुर्शीद यांची चार अल्पवयीन मुले मरण पावली आहे.
 
फौजिया बीबीचे पती आणि आरोपीचे जावई मेहमूद अहमद कामा निमित्त बाहेर गेले होते.त्यांनी घरी परत येताना  घराला आग लागलेली बघितली आणि घटनास्थळ वरून आरोपी सासरे आणि शालक साबीर हुसेन यांना पळून जाताना बघितले. जावई महमूद याने आरोपी सासऱ्या आणि शालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. 
पोलिसांना मेहमूद यांनी सांगितल्यानुसार मेहमूद आणि फौजिया बीबी ने 2020 साली प्रेम विवाह केला होता. या विवाहाला आरोपी मंजूर हुसेन यांची परवानगी न्हवती.ते या लग्नाचा विरोध करत होते. या कारणास्तव ते आमच्यावर चिडले होते. त्यातूनच त्यांनी हे केले  .
या घटनेत मेहमूद अहमद यांच्या पत्नी फौजिया आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून आरोपीला अटक केली आहे.