Imran Khan: पाकिस्तानात गदारोळ होण्याची शक्यता, इम्रान खानला कधीही अटक होऊ शकते
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये माजी पंतप्रधान आणि पीटीआय अध्यक्ष इम्रान खान यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे की, सरकार इम्रान खानला अटक करण्याचा विचार करत आहे. एआरवाय न्यूजने ही माहिती दिली आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, इस्लामाबादमधील रावल तलावाच्या पूर्व किनार्यावरील बनी गाला या निवासी क्षेत्राभोवती असामान्य हालचाली दिसून आल्या आहेत. त्याचवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी इम्रान खानविरोधात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.