सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 21 ऑगस्ट 2022 (13:32 IST)

Russia: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली घोषणा, 10 मुलांना जन्म द्या, लाखांचे बक्षीस मिळतील

bladimir putin
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या देशातील महिलांना 10 किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालण्याची अनोखी ऑफर दिली आहे. त्या बदल्यात त्यांना पैसेही दिले जातील. त्याच वेळी, तज्ञ पुतीन यांच्या या ऑफरला निराशेने घेतलेला निर्णय मानत आहेत.
 
राष्ट्रपतींच्या नवीन प्रस्तावानुसार, दहा मुलांना जन्म देण्याच्या आणि त्यांना जिवंत ठेवण्याच्या बदल्यात सरकार मातांना सुमारे 13 लाख रुपये (£13,500) देईल. खरं तर, कोरोना महामारी आणि युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे रशियामध्ये लोकसंख्येचे संकट निर्माण झाले आहे. याला सामोरे जाण्यासाठी पुतिन यांनी देशातील महिलांसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.
 
रशियामध्ये कोरोनामुळे अगणित मृत्यू आणि युक्रेन युद्धात आतापर्यंत 50 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सुरक्षा तज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी सांगितले की, पुतिन यांचा विश्वास आहे की अधिक मुले असलेली कुटुंबे अधिक देशभक्त असतात. हे अत्यंत निराशाजनक विधान आहे.
 
पुतीन यांच्या या प्रस्तावानुसार, जर एखाद्या महिलेने दहा मुलांना जन्म दिला आणि त्यांना जिवंत ठेवले तर सरकार त्यांना 'मदर हिरोईन' योजनेंतर्गत 13 लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. हा सन्मान प्राप्त करण्यासाठी, स्त्रीने रशियन फेडरेशनची नागरिक असणे आवश्यक आहे. सरकारी निर्देशानुसार, एखाद्या मातेने आपत्कालीन परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ल्यात आपले मूल गमावले, तरीही ती या सन्मानाची पात्र असेल.