शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

भारतीय पायलट बघत होता अश्लील व्हिडिओ, व्हिसा रद्द

चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करण्याच्या आरोपाखाली अमेरिकेच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी एका भारतीय पायलटच्या हातात प्रवाशांसमोर हथकडी लावण्यात आली आणि त्याला विमानातून खाली उतरवले गेले. पायलट सोमवारी नवी दिल्लीहून विमान घेऊन सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर पोहचला होता. मुंबईत राहणार्‍या या पायलटचे वय 50 वर्ष आहे आणि तो फर्स्ट ऑफिसर या रूपात भारतीय विमानन कंपनीत तैनात असून अनेकदा अमेरिकेत उड्डाण संचलित करत असतो.
 
नियमांप्रमाणे, अमेरिकेहून उड्डाण भरणार्‍या फ्लाइट्सच्या सर्व प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची माहिती उड्डाणाच्या 15 मिनिटात यूएस ब्युरो ऑफ कस्टम्स ऍड बॉर्डर प्रोटेक्शनला प्रदान करावी लागते. एका सूत्राप्रमाणे, फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (एफबीआई) एजेंट्सने त्याचं अमेरिकेत दाखल होण्याची वाट बघितली आणि नंतर त्याला अटक केली. 
 
सूत्रांप्रमाणे 'त्याचा पासपोर्ट सीज झाला असून अमेरिकी व्हिसा देखील रद्द केला गेला आहे. यानंतर त्याला दिल्लीच्या फ्लाइटमध्ये अमेरिकेहून निर्वासित केले गेले.' एका इतर सूत्राने सांगितले की, 'नंतर माहीत पडले की तो मागील दोन महिन्यांपासून चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड केल्यामुळे एफबीआयके स्कॅनरवर होता. अमेरिकेत हॉटेलमध्ये असताना त्याच्या इंटरनेट वापरण्यावर नजर ठेवल्यावर महत्त्वाचे पुरावे सापडले. एफबीआयने बंद दस्तऐवजामध्ये भारतीय अधिकार्‍यांना पुरावे सोपवले आहे.'
 
विमानन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की पायलटला व्हिसा प्रकरणात निर्वासित केले गेले आहे. परंतू विमानन कंपनीच्या सूत्रांप्रमाणे व्हिसासंबंधी प्रश्न चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधात केले गेले. 
 
अमेरिकन फेडरल कायद्यानुसार कोणताही बाह्य व्यक्ती जाणूनबुजून चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधी सामुग्री कोणालाही पाठवू शकत नाही, बनवू शकतं नाही आणि बघू शकतं नाही. कोणत्याही प्रकाराच्या यौन सामुग्री ज्यात माइनर अर्थात वयात नसलेले लोकं सामील असतील त्यावर अमेरिकेत बंदी घातलेली आहे.