बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (09:01 IST)

मौलाना मसूद अझहरच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक

अखेर पाकिस्ताने कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना जेरबंद केले. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी या कारवाईची माहिती दिली. 
 
मसूदचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ आणि हमाद अझहर याच्यासह ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. कोणत्याही बाह्य दबावाशिवाय ही कारवाई करण्यात आल्याचा दावा शहरयार यांनी केला. बंदी घालण्यात आलेल्या संघटनांविरोधात ही कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले आहे.