रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 4 मार्च 2019 (08:18 IST)

चार अफगाणींना दिल्ली विमानतळावर अटक

दिल्ली विमानतळावर अफगाणिस्तानातून आलेल्या चार नागरीकांना आज अटक करण्यात आली. त्यांनी अफगाणिस्तानातून मादक द्रव्ये चोरट्या मार्गाने आणली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी त्यांच्या पोटात 920 ग्रॅमच्या कॅप्सुल्स दडवल्या होत्या. सफदरजंग हॉस्पीटल मध्ये त्यांना दाखल करून या कॅप्सुल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत.
 
दिल्ली आणि परिसरात विण्यासाठी त्यांनी हा माल आणला होता. त्यांच्या पोटात अजूनही काही कॅप्सुल्स आहेत आणि त्या काढण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल अशी माहिती संबंधीत सूत्रांनी दिली आहे. हे चारही जण मादक द्रव्यांचा चोरटा वापर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गॅंगचे सदस्य आहेत. त्यांच्या विषयी तपास अधिकाऱ्यांना गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.