रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (16:26 IST)

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी  प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक पुराणिक नावाच्या तरुणीला कलम 306, 384 आणि 34 अंतर्गत अटक केली आहे. भैयू महाराज आत्महत्या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. पलकने प्रेम संबंध बनवून भैयू महराजांकडून लाखो रुपये लूटले होते. त्यांच्यावर लग्नासाठी तरुणी दबाव टाकत होती. पोलिसांनी तीन आरोपींना कोर्टासमोर हजर करत पोलिसांत पाठवले आहे. 
 
भैय्यू महाराजांनी गेल्या वर्षी 12 जूनला घरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीला पलक पुराणिक आणि सेवक विनायक दुधळे, शरद देशमुख ब्लॅकमेल करुन त्रास देत होते असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.