रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली आहे. मुराक्काबात पोलीस स्टेशनमध्ये मिकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिकाने आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा ब्राझीलची नागरिक असलेल्या १७ वर्षीय मुलीचा आरोप आहे. मुलीच्या तक्रारीवरून मिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिका सिंग एका शोसाठी गेल्या काही दिवसांपासून दुबईत होता. सध्या तो दुबईच्या कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी सूत्रांना दिली. त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती देखील सूत्रांकडून आली आहे.