बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (08:59 IST)

सिरीयल मोलेस्टरला अटक अनेक महिलांचा विनयभंग

Many women molested in serial Mallester arrested
‘आज सोमवार है क्या..अरे पॅण्ट कमरसे निकलेगी’,आज मेकअप ज्यादा लगा है..अशा घाणेरडी आणि  अश्लील शेरेबाजी करत शाळकरी, कॉलेज विद्यार्थीनी, तरुणींसह विवाहित महिलांना कपडे, तसेच त्यांच्या अंगकाठीवरुन छेड़छाडीच्या घटना वाढल्या होत्या. एका  सिरीयल मोलेस्टरने बुलेटवरून येऊन एका महिलेला अश्लील स्पर्श करून विनयभंग केला होता. याप्रकरणी महिलेने नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासा केला त्यांनतर मुंबई येथील  घाटकोपर आरसीटी मॉल येथून विरेन शहा (३८) या नराधमास अटक केली होती. पोलीस ठाण्यात त्याला पोलिसीखाक्या दाखवला असता या गुन्ह्यातील आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर वघर पोलिसांनी शहाला अटक केली आहे. मुलुंड परिसरात सिरियल मोलेस्टरची धास्ती घेतली होती. मुलुंडसह ठाणे परिसरात रात्री जेवणानंतर वॉकिंगला जाणाऱ्या तरुणी, महिला आणि एकट्या तसेच वृद्धांसोबत जात असलेल्या विद्यार्थीनीसह महिलांना अश्लील स्पर्श करणारा शहा या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता महिला वर्ग सुरक्षित असून कोणतेही अनुचित घटना घडली तर नक्की पोलिसांना कळवा असे आवाहन केले आहे.