रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (08:53 IST)

वेळ आहे आता होऊ द्या आर पार - अण्णा हजारे

पुलवामातील जवानांवरील हा अत्यंत भ्याड हल्ला असून, हल्ल्याने संपूर्ण देशाला वेदना झाल्या आणि संताप अनावर झाला आहे. आणखी किती दिवस जवान शहीद होणार? एकदा होऊ द्या आरपार! यांना धडा शिकवलाच पाहिजे. यावर सरकारने गंभीर पणे आता विचार करावे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत व्यक्त केले आहे. अण्णा हजारे म्हणाले, एकदा होऊ द्या आरपार! अशी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच भावना असून, त्यामुळे केंद्र सरकारने सर्वांच्याच भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, आज वयोमानानुसार मला शस्त्र पेलवणार नाही. पण जर माझी गरज पडलीच तर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना सामुग्री पुरवण्याचे काम आजही करीन, अशी प्रतिक्रिया खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. देशात दहशतवादी हल्ला झाला यामुळे संतापाचे वातवरण आहे.