रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (08:47 IST)

अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

Anna Hazare
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून अहमदनगरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी  दाखल केले आहे. लोकपाल नियुक्ती, आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून उपोषण आंदोलन केले होते. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर अण्णा आपले उपोषण थांबवले. मात्र यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघडली आहे. अण्णांना अधिक थकवा जाणवू लागला होता, त्यांच्या वैद्यकीय तपासण्या होणे खूप गरजेचं होते. या पार्श्वभूमीवर डॉ. सय्यद आणि डॉ. धनंजय पोटे यांच्या सल्ल्यानुसार अण्णांना तपासणीसाठी नगरला नेले आहे. डॉ. सुहास घुले यांनी अण्णांच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण केल्या असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांना अजून काही काळ रुग्णालयात ठेवले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.