मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (09:52 IST)

आता शेतकरी वर्गाचा लॉंग मार्च २० पासून सुरुवात २७ तारखेला मंत्रालयावर धडकणार

नाशिक येथून 20 फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरू होणार असून,. 27 फेब्रुवारी रोजी तो मंत्रालयावर पोहोचणार आहे. अजूनही मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु असून, कोणताही योग्य निर्णय झाला नाही  असा आरोप अजित नवले यांनी केला आहे. शहरी लोक म्हणतात, किती कर्जमाफी करायची. पण, त्यांना सांगा प्रत्येकवेळी शेतकरी लुटला गेला आहे. एका बाजूला सरकार भाव पाडते, कीटकनाशकांचा भाव सरकारला ठरविता येते नाही. पण सरकार शेतमालाचे भाव वाढले की हस्तक्षेप करते. यातून शेतकर्यांची लूट होत असल्याचेही अजित नवले यांनी यावेळी म्हटले आहे. नवले पुढे म्हणाले की शेतकऱ्यांची झालेली लूट आम्ही परत मागत आहोत, ती कर्जमाफी नव्हे. उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने 18 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असून, त्यावर कोणीच आक्षेप घेत नाही. मग, शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे का. एकाही उद्योजकाने आत्महत्या केली नाही. इकडे शेतकरी रोज मरत आहेत दोघांनाही वेगवेगळा न्याय का.? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सरकारची कर्जमुक्ती नाही कर्ज वसुली मोहीम सरकारने राबवली असून, जेव्हढे पैसे सरकारने कर्ज माफीत दिले नाहीत, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वसुली केले आहेत. आता शेतकरी मुख्यमंत्र्यांना सोडणार नाही, पूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असेही अजित नवले यांनी अहमदनगर येथील राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेत बोलताना म्हटले आहे. आता लोकसभेच्या तोंडावर सरकारला या शेतकरी मोर्चाला कसे समोरे जाते ते पहावे लागणार असून शेतकरी वर्गाचा राग दूर करवा लागणार आहे.