शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: चेन्नई , गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (14:15 IST)

टिक टॉक अ‍ॅप बंद करण्याची मंत्र्यांची मागणी

भारतात टिक टॉक अ‍ॅपचा गैरवापर करण्यात येत आहे. टिक टॉक अ‍ॅपमध्ये अश्लील मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने या अ‍ॅपवर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी तमिळनाडूमधील एका मंत्र्याने सरकारकडे केली आहे.
 
तमिळनाडू सरकारमधील माहिती तंत्रज्ञानंत्री ए. मणिकंदन यांनी विधानसभेत बोलताना ही मागणी केली आहे. टिक टॉक अ‍ॅप हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही. या अ‍ॅपचा वापर अश्र्लील व्हिडिओ, मजकूर अपलोड करण्यासाठी केला जात आहे. टिक टॉक अ‍ॅपवर पोर्न व्हिडिओ अपलोड करण्यात येत आहेत. हा अ‍ॅप बनवणारी कंपनी Bytedance लाही हा अश्र्लील जकूर हटवण्यात अपयश आले आहे, असे ए. मणिकंदन यांनी म्हटले.
 
ए. मणिकंदन यांनी याआधीही सुसाइड गेम्ससारख्या ब्लू व्हेल चॅलेंज गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. टिक टॉक अ‍ॅप हा तरुणाईचा आवडता अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शॉर्टव्हिडिओ तयार करून तो शेअर करता येऊ शकतो.