गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (12:44 IST)

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीला शॉपिंग मॉलच्या बाहेर ढकलले, पायऱ्यांवरून पडून मृत्यू

सिंगापूरमध्ये एका शॉपिंग मॉलच्या बाहेर एका व्यक्तीने भारतीय मूळच्या एका तरुणाला धक्का दिला, यामुळे पायर्‍यांवरुन खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे.
 
‘द स्ट्रेट टाइम्स’ वृत्तपत्रात शुक्रवारी प्रकाशित एका बातमीनुसार 34 वर्षीय थेवेंद्रन षणमुगम यांना मागील महिन्यात ऑर्चर्ड रोड स्थित कॉनकॉर्ड शॉपिंग मॉलमध्ये एक व्यक्तीने पायर्‍यांवरुन खाली ढकलून दिले होते. वृत्तानुसार षणमुगम पायऱ्यांवरून पडल्यामुळे त्यांच्या कवटीला अनेक फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथे त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.
 
वृत्तानुसार षणमुगम यांच्यावर शुक्रवार संध्याकाळी मंदाई स्मशान घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. षणमुगम यांना ढकलणार्‍या मुहम्मद अजफारी अब्दुल कहा (27) वर जाणूनबुजून एका व्यक्तीला गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, षणमुगम आणि कहा एकमेकांना ओळखत होते की नाही, हे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालेले नाही.
 
दोषी आढळल्यास, काहाला दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास, तसेच चाबकाची किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते, असे ‘द स्ट्रेट टाइम्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे.