गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (20:31 IST)

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अंदाधुंद गोळीबार, 3 ठार, 4 जखमी

Los Angeles america Shooting in America mob lynched
Los Angeles america:  अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे रविवारी एका पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले. लॉस एंजेलिस पोलिस विभागाचे प्रवक्ते जेडर चावेस यांनी सांगितले की, जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
 
लॉस एंजेलिसच्या बॉयल हाईट्समध्ये रविवारी दुपारी 12:30 च्या सुमारास झालेल्या गोळीबारामागील हेतू काय होता हे तपासकर्त्यांना अद्याप समजलेले नाही. चावेस म्हणाले की, इतर दोन जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि जखमी झालेल्या चौथ्या व्यक्तीला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ते म्हणाले की अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दोन लोक मृत दिसले आणि तिसऱ्या व्यक्तीला उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले.