गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (09:13 IST)

ब्राझीलच्या दोन शाळांमध्ये अंदाधुंद गोळीबार, तीन ठार, 11 जखमी

ब्राझीलमधून दोन शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेत झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुलेटप्रूफ वेस्ट घातलेल्या शूटरने दक्षिणपूर्व ब्राझीलमधील दोन शाळांवर हल्ला केला, दोन शिक्षक आणि एक विद्यार्थी ठार झाला आणि 11 इतर जखमी झाले.
 
पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की एस्पिरिटो सॅंटो राज्यातील अरक्रूझ या छोट्या शहरातील एकाच रस्त्यावर असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि एका खाजगी शाळेत गोळीबार झाला. राज्याचे गव्हर्नर रेनाटो कॅसग्रांडे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर संशयित शूटरला अटक केली. राज्यपालांनी ट्विट केले की आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू ठेवू आणि लवकरच अधिक माहिती गोळा करू.
 
सुरक्षा कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये हल्लेखोर बुलेटप्रूफ वेस्ट घातलेला आणि हल्ले करण्यासाठी अर्धस्वयंचलित पिस्तूल वापरत असल्याचे दिसून आले, एस्पिरिटो सॅंटोचे सार्वजनिक सुरक्षा सचिव मार्सिओ सेलेंटे यांनी सचिवालयात एक व्हिडिओ जारी केला. या घटनेत अकरा जण जखमी झाले, सेलेंटे म्हणाले की, शूटर पब्लिक शाळेचे चे कुलूप तोडून शिक्षकांच्या विश्रामगृहात घुसला.
 
Edited By - Priya Dixit