मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (13:40 IST)

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या 240 प्रवाशी विमानात बॉम्बची माहिती

रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 240 प्रवासी होते. हे विमान पहाटे 4.15 वाजता दक्षिण गोव्यातील दाबोलीम विमानतळावर उतरणार होते.
 
 Azur Air द्वारे संचालित फ्लाइट AZV2463 भारतीय हवाई हद्दीत पोहोचण्यापूर्वी वळवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाबोलिम विमानतळ संचालकांना सकाळी 12.30 वाजता ईमेलद्वारे या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच ती वळवण्यात आली. 
 
दोन आठवड्यांपूर्वी मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचीही माहिती समोर आली होती. यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, त्यानंतर बॉम्बची माहिती खोटी निघाली.
 
Edited By- Priya Dixit