Israel-Hamas War:खान युनिस भागात इस्रायलच्या लष्कराच्या हल्ल्यात 19 ठार
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. हमास देखील आपल्या कारवायांपासून मागे हटत नाही. या सगळ्यामध्ये इस्रायली लष्कराने दक्षिण गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात हमासचे तीन प्रमुख कमांडर मारल्याचा दावा केला आहे.
इस्रायली सैन्याने केलेल्या या हल्ल्याची माहिती गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. खान युनूसच्या मवासी भागातील विस्थापित पॅलेस्टिनींच्या गर्दीच्या तंबूच्या छावणीला हे हल्ले लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इस्त्रायली लष्करानेही आपल्या हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात आयडीएफने म्हटले आहे की त्यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे खान युनिसवर हल्ला केला.
इस्रायली सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील हमासच्या हवाई युनिटचे प्रमुख समर इस्माईल खादर अबू डक्का, हमासच्या लष्करी गुप्तचर मुख्यालयातील तपासणी विभागाचे प्रमुख ओसामा ताबेश, आणि हमासचा एक वरिष्ठ दहशतवादी आयमन माबोह मारला गेला.
Edited By - Priya Dixit