गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :टोकियो , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:25 IST)

Japan Earthquake: जपानमध्ये जोरदार भूकंप, 7.3 तीव्रता, सुनामीचा इशारा जारी

जपानमध्ये बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.3 इतकी मोजली गेली, जी खूप जास्त आहे. हा भूकंप रात्री ८:०६ च्या सुमारास जपानची राजधानी टोकियोच्या वायव्येस २९७ किमी अंतरावर होता. जोरदार भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
उत्तर जपानमधील फुकुशिमाच्या किनाऱ्यावर बुधवारी संध्याकाळी ७.३- तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रसपाटीपासून 60 किलोमीटर खाली होता, असे जपानच्या हवामान संस्थेने सांगितले. उत्तर जपानचा भाग असलेला हा प्रदेश नऊ तीव्रतेचा विनाशकारी भूकंप आणि त्सुनामीने उद्ध्वस्त झाला होता. भूकंपामुळे आण्विक आपत्तीही आली. भूकंपामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.