गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (16:58 IST)

कराची : पाकिस्तानातील कराचीमध्ये भीषण स्फोट

पाकिस्तानातील कराचीमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या स्फोटात 11 जण ठार झाल्याची माहिती आहे. कराचीच्या शेरशाह भागातील परचा चौकाजवळ हा स्फोट झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. स्फोटात जखमी झालेल्या 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी जफर अली शाह यांनी सांगितले की, हा स्फोट एका खाजगी बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात झाला.
 
बँकेच्या इमारतीचे आणि पेट्रोल पंपाचे नुकसान
स्थानिक प्रशासनाने नाला साफ करण्याची नोटीसही दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु जागा उपलब्ध न झाल्याने त्यास विलंब झाला. या स्फोटात बँकेच्या इमारतीचे आणि जवळच्या पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इमारतीखालील नाल्यात वायू साचल्यामुळे हा स्फोट झाल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
 
बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी पोहोचले,
तथापि, नंतर पोलिस प्रवक्त्याने सांगितले की बॉम्ब निकामी पथकाला स्फोटाच्या ठिकाणी तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. पथकाने अहवाल दिल्यानंतरच स्फोटाच्या कारणाबाबत अधिकृत विधान करता येईल. एका निवेदनात सिंध रेंजर्सने सांगितले की, स्फोटाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या ठिकाणी धाव घेतली आणि परिसराला वेढा घातला.
 
ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे,
स्फोटाच्या फुटेजमध्ये एक क्षतिग्रस्त इमारत आणि मलबा जमिनीवर पडलेला दिसत आहे. स्फोटाच्या ठिकाणी तुटलेली वाहनेही पाहायला मिळतात. घटनास्थळावरील ढिगारा हटवण्यासाठी स्थानिक लोकही सहकार्य करत आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासन, पोलिस दल आणि सिंध रेंजर्स ढिगाऱ्यांचा तपास करण्यात व्यस्त आहेत.