1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Lahore blast

लाहोरमध्ये स्फोट, २५ ठार, ३९ जखमी

लाहोरमध्ये स्फोट
पाकिस्तानमधील लाहोरमध्ये स्फोट झाला आहे. लाहोर शहरातील अरफा करीम आयटी टॉवरजवळ स्फोट झाला आहे.या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाजवळ हा स्फोट झाला आहे.
 
‘लाहोर शहरातील अरफा करीम आयटी टॉवर परिसरातील अतिक्रमणाच्या विरोधात अभियान चालवले जात होते. या भागातील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जात असताना स्फोट झाला. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचे सहाय्य घेण्यात आले होते. पोलिसांच्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांचा स्फोटात मृत्यू झाला,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक इमरान अवान यांनी दिली आहे.
पुढील लेख
आमदार बच्चू कडू यांचा पुन्हा राडा, जामीन मंजूर