शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

या शाळेत हेल्मेट लावून शिकवतात शिक्षक (Video)

बाइक चालवताना हेल्मेट घातलेले लोकं आपण बघितले असतील परंतू शाळेत शिकवताना हेल्मेट घालण्याची काय गरज? पण तेलंगणाच्या एका शाळेत शिक्षक हेल्मेट घालूनच विद्यार्थ्यांना शिकवतात. निश्चितच हे ऐकल्यावर आपल्या हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की या मागील कारण काय असावे, तर हेल्मेट घालून शिकवणे शिक्षकांचा छंद नसून मजबूरी आहे.
 
तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात चिन्ना शंकरमपेट स्थित जिल्हा परिषद हाय स्कूलमध्ये शिक्षक हेल्मेट घालून मुलांना शिकवतात. जेव्हा ही येथे पाऊस सुरू होतो तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी मुलं आणि शिक्षक बाहेर निघून जातात कारण त्यांना शाळेतील भिंत आणि छत पडण्याची भीती सतावते. जिल्हा परिषदाचे हे हाय स्कूल 60 वर्ष जुन्या इमारतीत संचलित केले जातं. जिथे 219 मुलींसह 664 विद्यार्थी शिक्षण घेतात.
 
शाळेच्या 22 शिक्षकांनी जर्जर इमारतीबद्दल मागील तीन वर्षात अनेकदा तक्रार नोंदवली तरी काही कारवाई न झाल्यामुळे निषेध म्हणून त्यांनी हेल्मेट घालून शिकवण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांप्रमाणे पावसाळ्यात मुलांची सुट्टी करण्यात येते कारण शाळेत त्यांच्यासाठी कुणलीही जागा सुरक्षित नाही. छत पडण्याच्या भीतीमुळे वर्गातच नव्हे तर स्टॉफ रूममध्येदेखील शिक्षक हेल्मेट घालूनच बसतात.