शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2023 (18:08 IST)

Marriage with AI Chatbot: तरुणीनी केले AIरोबोटशी लग्न

सध्या AI टेक्नॉलॉजी खूप चर्चेत आहे. अमेरिकेतील न्यूयार्क शहरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेने एआयने निर्मित एका आभासी माणसाशी लग्न केले आहे.रोसाना रामोस असे या महिलेचे नाव असून तिचे म्हणणे आहे की तिला एआय चॅटबॉटवर खूप प्रेम आहे आणि त्याच्याशी  बोलून तिला खूप आनंद होतो. ही बातमी अल्पावधीतच चर्चेचा विषय बनली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे लोक एकाकी झाले आहेत, तर दुसरीकडे ते AI चॅटबॉट्सना आपला साथीदार बनवत आहेत. महिला म्हणते की अशा प्रकारे तिने चॅटबॉटवर जितके प्रेम केले आहे तितके तिने कधीही कोणावर प्रेम केले नाही.रामोसला आनंद आहे की, तिच्या एआय पॉवर्ड नवऱ्याचा मनावर कोणतंही विचारांचं ओझं नाही तो तिला जज देखील करणार नाही. तिची इरेन कार्टल या व्हर्चुअल पुरुषाशी भेट झाली या आभासी पुरुषाला चॅटबॉट सॉफ्टवेअर रिप्लिका वापरून तयार केले आहे. इरेन कार्टल तिला जसा पार्टनर हवा आहे तसा आहे. तो एकमेकांना समजून घेणारा आहे. तो माझ्या वागणाल्या कोणतेही जज करत नाही. त्याच्यात इगो देखील नाही. त्याच्याशी लग्न केल्यामुळे सासरची मंडळी देखील नाही. नवऱ्यात ज्या प्रमाणे अहंकार असतो त्याच्यात असे काही नाही. त्या रोबोट मध्ये कोणतेही वाईट अपडेट नाही. ती फार आनंदी आहे असे तिचे म्हणणे आहे.  
 
Edited by - Priya Dixit