शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 20 मार्च 2022 (15:07 IST)

पाकिस्तानांत सियालकोट लष्करी तळावर भीषण स्फोट, सगळीकडे आग

उत्तर पाकिस्तानमधून मोठी माहिती समोर येत आहे. सियालकोटमधील लष्करी तळावर मालिका बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूला प्रचंड ज्वाळा दिसत आहेत. पंजाब प्रांतातील कॅन्टोन्मेंट परिसराजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला. द डेली मिलापचे संपादक ऋषी सुरी यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, उत्तर पाकिस्तानमधील सियालकोट लष्करी तळावर अनेक स्फोट झाले. हे दारुगोळा साठवण क्षेत्र असल्याचे प्रारंभिक संकेत आहेत. आजूबाजूला प्रचंड आग पेटत आहे. याचे कारण अद्याप कळलेले नाही.
 
या स्फोटानंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लोक घाबरले आहेत. त्याचबरोबर या स्फोटात किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ज्या पद्धतीने हे स्फोट झाले त्यावरून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटामागे कोणाचा हात आहे याची माहिती समोर आलेली नाही.