संबंधित माहिती
- खाद्यपदार्थ विकणं तुमचं काम नाही, कोर्टाने सुनावले
- कायदा सुव्यवस्था, प्रसारमाध्यमे, सरकार सर्वच गोष्टी हातात घेत आहे - जयंत पाटील
- रिक्षाचालक जिद्दीने बनले महापौर, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता
- प्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची आत्महत्या
- राजकीय इच्छाशक्ती शक्ती नाही म्हणून आरक्षण नाही - उदयन राजे
सिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. याशिवाय, शपथविधी सुरु असताना सिद्धू पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या शेजारच्या आसनावर बसले होते.
यावरुन सिद्धू यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. एक व्यक्ती आणि मंत्री म्हणून सिद्धू्ंचे हे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे. याविषयी आता केवळ तेच स्पष्टीकरण देऊ शकतात. सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते.
पुढील लेख
