गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2019 (09:57 IST)

आता मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर  आहे. मात्र आता त्याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.