शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

धन्यवाद मोदीजी, ओबामांनी मानले आभार

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन देशाचे आणि त्यांचे  आभार मानले आहेत. ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकामधील संबंध आणखी सुधारल्याबद्दल ओबामांनी मोदींना फोन करुन थँक्यू म्हटल आहे.

डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर बातचीत झाली होती. दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्परसंबंध वाढवण्यावर भर दिल्याने ओबामांनी मोदींचे आभार मानले आहेत.