इजिप्तमध्ये तेलाच्या टँकरला लागलेल्या भीषण आगीत ३१ जणांचा मृत्यू
इजिप्तची राजधानी कैरोमध्ये एका तेलाच्या टँकरला आग लागली, ज्यामुळे जवळच्या अनेक वाहनांना आग लागली आणि यात ३१ जणांचा मृत्यू झाला. तर २१ हून अधिक लोक जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इजिप्तची राजधानी कैरोमधील रिंग रोडवर एका तेलाच्या टँकरला आग लागल्याने किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आणि २१ हून अधिक जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेली ही आग वेगाने पसरली आणि जवळच्या अनेक वाहनांना आपल्या भक्ष्यस्थानी पडली, भरधाव वेगाने जाणाऱ्या तेलाच्या टँकरवरील नियंत्रण सुटले आणि तो महामार्गावर उलटला, ज्यामुळे स्फोट होऊन आग लागली. अग्निशमन दलाने आता आगीवर नियंत्रण मिळवले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. हा अपघात कैरोच्या इम्बाबा उपनगरातील वर्राक परिसरात घडला.

