बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

OMG! वर्षभराच्या चिमुकलीला बिअर पाजतो बाप (व्हिडिओ)

beer to little girl
आई- वडिलांप्रती ही समजूत असते की त्यांना माहीत असतं की त्याच्या लहान मुलांसाठी काय योग्य आहे आणि काय नाही.  तसेच लहान मुलं ओल्या मातीसारखे असतं, त्यांना जसं घडवू इच्छित असाल तसे ते घडत जाता. परंतू कधी-कधी असेही पालक बघायला मिळतात जे आपल्या मुलांचे वैरी असतात असे म्हणायलाही हरकत नाही.
 
अशाच एक व्हिडिओ मिरर डॉट कॉम वर आला आहे ज्यात अंदाजे एक वर्षाहूनही लहान एका मुलीला तिचे वडील पाण्याऐवजी बिअर प्यायला देत आहे. ही सवय लागली असावी म्हणा की त्या मुलीला पाणी दिल्यावर तिने पिण्यास नकार देते आणि बिअर दिल्यावर लगेच तोंडाला लावते. ती मुलगीही लहानपणापासून बिअरची शौकिन दिसत आहे.
 
मुलीचे वडील जेव्हा ही बिअर पितात मुलीलाही देतात. यात अल्कोहलची मात्रा असते हे तर सर्वांनाच माहीत आहे पण आता ती मुलगी बिअर प्यायलाशिवाय राहतच नाही. म्हणतात सुरुवातीला वडील मजा म्हणून तिला बिअर पाजायचा, पण आता ती मुलगी पाणी आणि दुधाऐवजी बिअर पिण्याची जिद्द करते.
 
एवढ्या लहान वयात मुलगी बिअर कशी सहन करते, हे आश्चर्यच आहे. तसेच या व्हिडिओवर थू थू होत आहे. लोकं तर या मुलीच्या बापाला अटक करण्याची मागणी करत आहे.