गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (09:21 IST)

पाकचा कांगावा, काश्मीरमध्ये विशेष दूत तैनात करा

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे.  भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही अब्बासी यांनी केला. 

काश्मीर मुद्यावर बोलताना अब्बासी म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील लोकांचा संघर्ष भारत मोडीत काढत आहे. दरम्यान UNमध्ये आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान अब्बासी यांनी 17 वेळा काश्मीर मुद्याचा तर 14 वेळा भारताचा उल्लेख केला. अब्बासी यांनी यावेळी असाही कांगावा केला की,  पाकिस्तान देश निर्माण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वारंवार शेजारील देशाच्या (भारत) शत्रुत्वाचा सामना करावा लागत आहे. तसंच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांची अंमलबजावणीही करत नाही.