जेव्हा झोपल्यावर कोरोना झोपतो तर मृत्यूनंतर मरतो...पाकिस्तानचा Coronavirus वर ज्ञान जाणून हैराण व्हाल
जमात उलेमा-ए-पाकिस्तानचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी म्हटले की जेव्हा झोपल्यावर कोरोना देखील झोपून जातो तर व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर मरून देखील जातो.
मौलाना फजल यांनी म्हटले की कोरोनाबाबत भीती निर्माण केली जात आहे. भीतीमुळे माणसाचं इम्यून सिस्टम कमकुवत होतं आणि अशात लढा देणे कठिण जातं. त्यांनी म्हटले की डॉक्टर म्हणतात की व्यक्तीच्या झोपण्यानंतर कोरोना देखील झोपतो तर मेल्यानंतर मृत होतं म्हणून याबद्दल भीती निर्माण करणे योग्य नाही.
त्यांचे म्हणणे आहे की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं देह कुटुंबाला सोपविलं जातं नाही. त्यांना योग्य रित्या सुपूर्दे खाक केलं जात नाही. उल्लेखनीय आहे की या मौलाना यांनी आझादी मार्च घोषणा केली होती इम्रान सरकारला बाहेर काढेपर्यंत हे जारी ठेवणार असे म्हटले होते.
हवामान बदल मंत्र्यांनी समजवले कोविड-19 बद्दल : पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री जरताज गुल वजीर देखील कोविड-19 ची परिभाषा दिल्यामुळे चर्चेत आहे. त्यांनी एका खासगी चॅनलवर कोविड-19 बद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देत म्हटले की कोविड-19 चा अर्थ यात 19 पॉइंट असतात. जे कोणत्याही देशात कोणत्याही प्रकारे लागू होऊ शकतात आणि आपण आपली इम्यूनिटी डेव्हलप करा. त्यांचा हा वीडियो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे.