शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (12:24 IST)

गोव्यात कोरोनाचा पहिला बळी

गोवा राज्यात कोरोनाचा आज पहिला बळी गेला. मोरले सत्तरी गावातील ८५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे आज पहाटे मडगावातील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला.
 
या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी प्रकृती अत्यवस्थ झाल्याने अति दक्षता विभागात दाखल केले होते. आज पहाटे या रुग्णाचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. गोव्यात कोरोनाबधितांचा आकडा ६८२ असून आतापर्यंत १३५ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. दीड महिन्यांपूर्वी गोवा राज्य ग्रीन झोनमध्ये होतं.