मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (12:07 IST)

कोणतेही झोन असलं तरी हे बंदच राहील

केंद्र सरकारनं दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर आणखीन दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केलीय. म्हणजेच आता १७ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. या दरम्यान ग्रीन झोनमधील भागांना काही सूटही देण्यात आलीय. या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टी बंदच राहतील हे जाणून घ्या. 
 
लॉकडाऊन दरम्यान हवाई उड्डाण, रेल्वे सेवा आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची परवानगी नाही. 
या दरम्यान केवळ इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वी आणि बसची व्यवस्था केली जात आहे. 
या दरम्यान शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांचं संचालनही बंद असेल. 
रेस्टॉरंट, हॉटेल, पूजा स्थळ आणि लोकांनी एकत्र जमण्याला बंदी सुरूच राहील.
सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडण्याला बंदी असेल. 
तसेच या दरम्यान गर्भवती महिला, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती आणि १० वर्षांहून लहान मुलांनी घराबाहेर पडू नये असे निर्देश देण्यात आले आहे. 
कंटेन्मेंट भागात औषधांची दुकानंही बंद राहतील.