शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 21 जून 2020 (10:42 IST)

देशात २४ तासांत सर्वाधिक १५,४१३ कोरोना रुग्णांची नोंद तर ३०६ जणांचा मृत्यू!

देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात काल दिवसभरात १५ हजार ४१३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचला असून त्यापैकी १ लाख ६९ हजार ४५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशात आतापर्यंत १३ हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ८९ लाख १४ हजार ८१५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी ४ लाख ६६ हजार ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४५ लाख ३२ हजार ६९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.