रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (12:03 IST)

धारावीत 7 दिवसात एकही मृत्यू नाही

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे त्यात मुंबईतील वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. अशात एक सकारात्मक बातमी म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत गेल्या सात दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. 
 
एकेकाळी कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट धारावी येथे कोविड -19 च्या संख्येतही घट आहे. ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
 
बीएमसीच्या अधिकृत आकडेवारीनुसार 1 जून रोजी धारावी येथे कोरोना विषाणूचे 34 रुग्ण नोंदविले गेले होते, तर 7 जून रोजी एकूण 13 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 6 जूनला 10, 5 जूनला 17 आणि 4 जून रोजी 23 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 30 मे पासून धारावीत कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. 7 जूनपर्यंत धारावीमध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,912 होती. 
 
बीएमसीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार धारावीची लोकसंख्या 8.5 लाख आहे. परिसरातील एकूण 8,500 लोकांना विविध ठिकाणी सरकारी क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आलं. तसेच बीएमसीचे आरोग्य कर्मचारी, खासगी दवाखाने, मोबाइल व्हॅन, महानगरपालिकेचे दवाखाने इत्यादींनी सुमारे सहा ते सात लाख लोकांची घरोघरी चौकशी केली. सतत चाचण्या आणि जास्तीत जास्त तपासणीनंतर यश मिळत आहे.