सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (18:21 IST)

Philippines: लाईव्ह स्ट्रिम दरम्यान अँकरची हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद

murder
फिलिपाइन्समध्ये मारल्या गेलेल्या पत्रकारांच्या लांबलचक यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. एका रेडिओ प्रसारकाची त्याच्या स्टुडिओत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
 
कळंबा नगरपालिकेचे पोलिस प्रमुख कॅप्टन देवरे रागोन्यो यांनी सांगितले की, 57 वर्षीय जुआन जुमालोन 94.7 गोल्ड एफएम कळंबा स्टेशनवर स्वतःचा सेबुआनो भाषेतील शो होस्ट करत असे. त्याला 'डीजे जॉनी वॉकर' म्हणूनही ओळखले जाते. मिंडानाओच्या दक्षिणेकडील बेटावर झुमालन त्याच्या घरी स्टुडिओत असताना एका बंदुकधारीने त्याच्या डोक्यात गोळी झाडली. 
 
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बंदुकधारी व्यक्तीने जुमालोनला ऑन-एअर घोषणा करण्यास सांगितले होते, त्यानंतर त्याने आरोपीला स्टुडिओत येण्याची परवानगी दिली. त्यानंतर हल्लेखोराने त्यांच्यावर दोन वेळा गोळ्या झाडून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही संपूर्ण घटना स्टुडिओमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.  
 
राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी या हत्येचा निषेध केला आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. "आमच्या लोकशाहीत पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत आणि जे प्रेस स्वातंत्र्य धोक्यात आणतील त्यांना त्यांच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतील," असे मार्कोस यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.  
 










Edited by - Priya Dixit