निवासी इमारतीच्या बागेत विमान कोसळल्याने पायलटचा मृत्यू
Germany News: जर्मनीतील प्लेटेनबर्ग येथे एका निवासी इमारतीच्या बागेत एक छोटे विमान कोसळल्याने पायलटचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जर्मन एजन्सीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जर्मनीच्या पश्चिम नॉर्थ-राइन वेस्टफेलिया राज्यातील प्लेटेनबर्ग शहरात मंगळवारी संध्याकाळी एक सिंगल-इंजिन प्रोपेलर विमान कोसळले, त्यात पायलटचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारी घडला, जेव्हा विमान सॉरलँड प्रदेशातील प्लेटेनबर्ग येथील निवासी भागातील एका बागेत कोसळले. पोलिसांनी सांगितले की, पायलटचा जागीच मृत्यू झाला, परंतु त्याची ओळख अजून पटलेली नाही.
Edited By- Dhanashri Naik