1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (12:36 IST)

स्वीडनमध्ये विमान कोसळले, 9 ठार

स्कायडायव्हिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या विमानाचा स्विडनमधील ओरेब्रोच्या बाहेर विमानतळावर अपघात झाला असून त्यात नऊ जण ठार झाले.स्वीडनच्याओरेब्रोच्या बाहेर विमान अपघातात सर्व नऊ जण मृतावस्थेत आढळले आहेत,असे स्वीडिश पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
 
“हा एक अतिशय गंभीर अपघात आहे. क्रॅश झालेल्या विमानात बसलेल्या प्रत्येकाचा मृत्यू झाला आहे,” असे स्वीडिश पोलिसांनी सांगितले.
 
डीएचसी -2 टर्बो बीव्हर विमानात आठ स्कायडायव्हर आणि एक पायलट सवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. टेक ऑफ नंतर थोड्या वेळातच हे ओरेब्रो विमानतळावरील रनवे जवळ आदळले आणि नंतर त्याला आग लागली.
 
पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी ट्विटरवर लिहिले: "ओरेब्रोमध्ये विमान अपघाताची दुखद बातमी कळताच मला खूप दु: ख झाले आहे. या कठीण प्रसंगी पीडित, त्यांच्या कुटुंबिय आणि प्रियजनांबद्दल माझे शोक त्यांच्या सह आहेत.
 
2019 मध्येही स्कायडाइव्ह वर घेऊन जाणारे विमान उत्तर पूर्व स्वीडनमधील उमिया शहराच्या बाहेर कोसळल्याने नऊ जण ठार झाले.