गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (10:42 IST)

आकाशातून थेट रस्त्यावर पडले विमान, 10 जणांचा मृत्यू

Plane Crash in California
Malaysian Plane Crash:मलेशियातील क्वालालंपूर येथे एका एक्स्प्रेस वेवर चार्टर विमान कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. दोन फ्लाइट क्रूसह एकूण सहा जण विमानात होते. विमानाने लँगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते आणि ते सुलतान अब्दुल अजीज शाह विमानतळावर जात होते.  
 
मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एक निवेदन जारी केले की सबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचा विमानाशी पहिला संपर्क दुपारी 2.47 वाजता झाला. 2.48 मिनिटांनी विमानाला उतरण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मात्र नियंत्रण टॉवरला 2.51 मिनिटांनी अपघातस्थळावरून धूर निघताना दिसला.  
 
सेलंगोरचे पोलिस प्रमुख हुसेन उमर खान यांनी सांगितले की, विमानाने रस्त्यावरील कार आणि मोटारसायकलला धडक दिली.  दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी एक जण होता. फॉरेन्सिक मृतदेहांचे अवशेष गोळा करण्यात गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी तेंगकू अनपुआन रहिमह रुग्णालयात नेण्यात येणार आहेत.  याप्रकरणी परिवहन मंत्रालय चौकशी करणार असल्याचे खान यांनी सांगितले. या अपघाताची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये विमान अपघात दिसत आहे. 
 





Edited by - Priya Dixit