शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन

दुबई- यूएईच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले. पीएपीएस संस्थेद्वारे हे मंदिर उभारण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये मूळ भारतीय वंशाचे ३० लाखांपेक्षा जास्त लोक राहतात.
 
यावेळी मोदींनी यूएईमध्ये राहणार्‍या भारतीयांना संबोधित केले. हे मंदिर फक्त वास्तुकला आणि भव्यतेने अद्भूत नसेल, तर यामुळे 'वसुधैव कुटुंबकम' हा संदेश पूर्ण जगाला मिळेल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. ५० हजार चौरस मीटर जागेत हे पहिले हिंदू मंदिर तयार होणार आहे. भारताचे शिल्पकार हे मंदिर बांधत असून २०२० पर्यंत पूर्ण होईल व सर्वधर्मीयांसाठी हे मंदिर खुले असेल, असे मोदींनी सांगितले. 
 
मंदिरात पारंपरिक हिंदू मंदिराच्या सर्व विशेषता असतील आणि हे पूर्ण रूपाने कार्यात्मक, सामाजिक, सास्कृतिक व आध्यात्मिक परिसर असेल. नवी दिल्ली येथे बीएपीएस मंदिराची प्रतिकृती तयार होईल तसेच न्यू जर्सी येथे असेच मंदिर निर्माण कार्य सुरु आहे.