1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (09:20 IST)

चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत : इम्रान खान

pulwama attack
पुलवामामध्ये जी दु:खद घटना घडली तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भारतासमोर लोटांगण घालणारी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केली आहे. मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात असं सांगत खान यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधली युद्धांचा दाखला दिला.पाकिस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर इम्रान यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.