1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (16:03 IST)

रिचार्ज टू डिस्चार्ज’ उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनमध्ये नोंद

कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, जम्बो कोविड हॉस्पीटल, ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या “ रिचार्ज टू डिस्चार्ज ” या उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या ठिकाणी नोंद घेण्यात आली. या नोंदीबद्दल मिळालेले सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट ॲवार्ड केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते शिवप्रसाद महाले यांना देण्यात आले.
 
जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले होते. सर्वच नागरिक आजाराला घाबरुन भयभीत व प्रचंड तणावात होते. या आजारातून दिलासा मिळावा म्हणून कोविड रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना आजारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवणे अत्यंत गरजेचे होते. यावेळी शिवप्रसाद महाले (लाईफ कोच) यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, जम्बो कोविड हॉस्पीटल, ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल व महापालिकेच्या इतर रुग्णालयात “रिचार्ज टू डिस्चार्ज ” हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून महाले यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रत्यक्ष आयसीयु वार्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला.
 
महाले यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवरील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या ठिकाणी देखील घेण्यात आली. या नोंदीबद्दल मिळालेला सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट ॲवार्ड डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला, अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.